कार च्या धडकेत दुचाकी स्वारसह मागे बसलेला साथीदार जागीच ठार तर १ पादचारी युवक जखमी.

Picsart_23-01-16_21-18-28-483.jpg


प्रतिनिधी – एरंडोल
जळगाव कडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळकोठा गावापासून थोड्या अंतरावर एम.एच.१५ एच.वाय ०७०० ही मर्सिडीज गाडी जळगाव कडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. तसेच पिंपळकोठा कडून जळगावकडे जाणाऱ्या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील वय – २१ वर्षे व घनश्याम भानुदास बडगुजर वय – २० वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय ज्ञानेश्वर गणसिंग पाटील वय २२ वर्षे हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला.यावेळी माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
दरम्यान् ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
विशेष हे की, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर पाटील हा २१जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार होता.रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!