एरंडोल महाविद्यालयाच्या डॉ.शर्मिला गाडगे यांना “बेस्ट लायब्ररीयन अवॉर्ड”ने सन्मानित.

InCollage_20241213_103200247.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथील एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या  ग्रंथपाल, डॉ. शर्मिला गाडगे  मॅडम यांना “बेस्ट लायब्ररीयन अवॉर्ड-2024”  बहाल करण्यात आला आहे.
         बंगलोर येथे दिनांक 2,3 व 4 डिसेंबर,  2024 या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन बंगलोर विद्यापीठाचे ग्रंथालय व माहितीशास्र विभाग तसेच बाबासाहेब डॉ.बी.आर. आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
         या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील,उप- प्राचार्य प्रा. अरविंद बडगुजर  तसेच प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून
डॉ.शर्मिला गाडगे यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.
क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन ग्रंथपालानी डॉ. शर्मिला गाडगे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश- विदेशातील तीनशेहून अधिक ग्रंथपाल, शिक्षक उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!