शास्त्री फार्मसीत महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आदरांजली.

IMG-20241206-WA0126

प्रतिनिधी – एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत आज शुक्रवार दि. ०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वान दिना निमित्त समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ, विचारवंत,राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांना शास्त्री इन्स्टिटयूटचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. शास्त्री यांनी सांगितले की येवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा बाबासाहेबांनी येवढे उच्च शिक्षण घेऊन समाज प्रबोधन केले हा आदर्श आपण त्यांच्याकडून घ्यायला हवा. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला, या सोबतच स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यात असलेले त्यांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे त्याबद्दल सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे, प्रा. राहुल अहिरे व प्रा. दिग्विजय पाटील सहित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!