शास्त्री फार्मसी तर्फे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन.

IMG-20241206-WA0070

प्रतिनिधी – एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत शुक्रवार दि. ०६ डिसेंबर रोजी एड्स जनजागृती सप्ताहा निमित्त एड्स जनजागृती करिता प्रभात फेरीचे आयोजन शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी प्रभात फेरीचे उद्घाटन करून रवाना केले. शास्त्री फार्मसिच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जनजागृती फेरीत एचआयव्ही/एड्सच्या बाबतीत समाजातील गोंधळ आणि चुकीच्या समजुती दूर करणे आवश्यक आहे. आजच्या रॅलीने ह्याच उद्देशाने विद्यार्थ्यांना सामूहिकपणे एकत्र येऊन समाजात जागरूकता पसरवली. विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्ससंबंधीची योग्य माहिती प्रसार करण्यासाठी अनेक शालेय कार्यशाळा आणि चर्चा सत्रे देखील आयोजित केली. यावेळी विद्यार्थ्यांना “एचआयव्ही चाचणी महत्त्वाची आहे” आणि “सुरक्षित लैंगिक संबंध” याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे व प्रा. करण पावरा सहित सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथील समुपदेशक अंकुश थोरात व प्रयोग शाळा तंत्रज्ञ वीरेंद्र बिऱ्हाडे यांनी घेतले, समारोपाच्या वेळी अंकुश थोरात यांनी HIV/AIDS बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘मार्ग हक्काचा, सम्मानचा हा संदेश दिला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!