एरंडोल येथील ओम नगरच्या महिलांची सहल रवाना.
प्रतिनिधी – एरंडोल येथील ओम नगरच्या महिला एरंडोल ओम नगर ते देवगड येथे सहलीला रवाना झाल्या.त्यांना महामंडळातील सदस्यांनी प्रोहत्साहीत केल्याने सदर सहीलीचे आयोजन सर्व महिलांनी मिळून केले.
संसार प्रपंचातील कामातून वेळ काढून संसारात व्यस्त महिलांनी सहलीला जाण्याचे नियोजन केले.यासाठी ओम नगरातील रहिवाशी महामंडळातील बागुल साहेब, भराटे मॅडम,चालक – वाहक किशोर पाटील,मुकेश देसाई,माधुरी देसाई,नलिनी पाटील,सुनीता पाटील,पूनम महाजन,उमेश महाजन,सुलोचना पाटील,निता सुर्यवंशी,ज्योती पाटील,शारदा पाटील,मयुर पाटील,गणेश पाटील,प्रेमचंद पाटील,गजानन पाटील,प्रमोद पाटील,एस.आर.पाटील,माधव पाटील,लोकेश पाटील,राज पाटील यांनी महिलांचा एकोपा केला व सर्व संघटित महिलांना सहलीला जाण्यासाठी प्रोहत्साहित केले.ओम नगरातील महिलांची ही सहल महिला एक्याचे महत्व दर्शविणारी ठरत असुन सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.