बांगलादेशातील हिंदूच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जिवाचे संरक्षण करण्याबाबत एरंडोल येथे दिले निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील सकल हिंदू समाज बांधवांनी प्रधानमंत्री मोदी यांना एका पत्राद्वारे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवाचे संरक्षण करण्याबाबत पत्र दिले आहे.
पत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरिक आपल्यासमोर निवेदनाद्वारे असे विषद करतो की असे गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश येथे हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जिवाचे झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधून निदर्शनात येत आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरावर हल्ले झाले.त्यांची तोडफोड झाली,बाल वृद्ध व महिलांवर मानवीय अत्याचार व त्यात सातत्याने वाढ होत असल्याने ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकार्याचे हनन करणाऱ्या वृत्तीला रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही भारताचे हिंदू आपल्यासोबत ठामपणे असल्याचे म्हटले आहे तसेच अशा प्रकारे केलेल्या अत्याचारामुळे हिंदू समाज समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.या घटनांमुळे तेथील हिंदू लोकांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे तसेच २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने अटक केली हे निंदनीय आहे. सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने तसेच चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. जेथे त्यांना योग्य औषधपचार शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहे. व या कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना चे संबंधित कट्टर अतिरेक्यांना ठेवण्यात आल्याचे समजते महाराजांच्या जीवितास धोका निर्माण करणारी बाब असल्याचे म्हटले असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मानवाधिकाराचे जतन व्हावे याबद्दल आम्ही भारतातील हिंदू जागतिक स्तरावर होणाऱ्या हिंदूंच्या मानवा अधिकाराचे गांभीर्याने घेत आहोत आणि बांगलादेशात होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन आणि मानवाधिकाराचे हनन तात्काळ स्वरूपात बंद होईल अशी अपेक्षा करतो आणि भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्या स्तरावरून होणाऱ्या बांगलादेशी हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी उचलण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयात आम्ही ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
पत्रात प्रसाद दंडवते, भावेश तिवारी , योगेश महाजन , भूषण बडगुजर , राहुल लोहार , अरुण साळी , ज्ञानेश्वर मराठे , विजय पाटील , कृष्णा पुरोहित कुणाल महाजन राजेश पाटील आल्हाद काळे कुणाल पाटील शुभम सोनार वसंत पवार अजिंक्य काळे आकाश महाजन निंबा चौधरी, कैलास चौधरी , पापा दाभाडे, जयश्री पाटील , रश्मी दंडवते , आरती ठाकूर , शोभा साळी , क्षमा साळी, संध्या महाजन , शितल चौधरी , नंदा शुक्ला , संगीता पाटील असंख्य हिंदू समाज बांधव सोबत असंख्य महिला उपस्थित होते