एरंडोल बस आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम….
एरंडोल:-येथे राज्य परिवहन एरंडोल बस आगारात १६ जानेवारी २३ रोजी इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अमृत के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय पाटील होते कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून व नारळ फोडून करण्यात आले याप्रसंगी चालक वाहक यांत्रिक कर्मचारी यांना मन शांत ठेवून वाहन चालविणे तसेच उत्तम आरोग्यासाठी डोके तपासणी , शुगर, बीपी, रक्ताच्या चाचण्या वेळोवेळी करून घेण्याबाबत तसेच उत्तम आरोग्य राखण्यासाठी त्याचबरोबर व्यवस्थित वाहन चालवणे व इंधन बचत करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आगार व्यवस्थापक यांनी इंधनाचे महत्त्व व इंधनाची बचत ही काळाची गरज असून भावी पिढीसाठी इंधनाची बचत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बागले मॅडम, वाहतूक निरीक्षक भराटे, चौधरी आदी उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.