ट्रान्सफॉर्मर कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी लांबविला सात लाख ९४ हजाराचा काॅपर
एरंडोल – येथे म्हसावद रस्त्यावरील काबरा उद्योग समूहाच्या अंगारक ट्रांसफार्मर कंपनीतून ७ लाख ९४ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १८ जानेवारी २०२३ रोजी भल्या पहाटे घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहरा झाकलेल्या चार चोरट्यांनी अंगारक ट्रान्सफॉर्मर कंपनीत बुधवारी भल्या पहाटे प्रवेश करून कंपनीचे वॉचमन नामदेव सुखदेव चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. तसेच कार्यालयामधील संगणकाला लावलेल्या वायर तोडून नुकसान करण्यात आले. ५००० के व्ही ए क्षमतेच्या ट्रांसफार्मरच्या कॉपर कॉइल तोडून व रॅक मध्ये ठेवलेल्या काॅपर बाॅबीन, तोडलेल्या काॅपर कॉइल चोरून नेण्यात आले.
या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टे.ला भा.द.वि. कलम ३९२,३४२,३४ प्रमाणे पुढील तपास पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.