एरंडोल महाविद्यालयात पोस्टर्स स्पर्धा संपन्न
एरंडोल प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब दिगंबर शंकर पाटील, (माजी आमदार) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शन उद्घाटनाचा कार्यक्रम मा. आमदार आबासो. चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते रा. ती. काबरे विद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी य. च. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब अमित राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी मा. विनय गोसावी, एरंडोलचे तहसीलदार मा. सुचिता चव्हाण, एरंडोलचे मुख्याधिकारी मा. विकास नवाळे, पोलीस निरीक्षक मा. ज्ञानेश्वर जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य एन ए पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. ए. बडगुजर, आर. टी. काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मानुधने मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू व एरंडोल नगरीचे प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी एकूण १६ अज्ञात स्वातंत्र सैनिकांच्या जीवनावर आधारित पोस्टर सादर केलेत.सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत काम करणारे नीरा आर्या, कॅप्टन लक्ष्मी सहगल , १९४२ च्या स्वातंत्र चळवळीत भाग घेणाऱ्या आडगाव येथील हुतात्मे भगवान भुसारी, शामराव पाटील व त्र्यंबक वाणी, १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे डॉ. ब.तू.राठी, दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांनी सांगितले की,भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले परंतु त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही , पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ती माहिती पोहचवत आहोत.
या पोस्टर प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम ,द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. प्रथम पारितोषिक कविता गजानन गवांदे , द्वितीय पारितोषिक कोमल पाटील व तृतीय पारितोषिक प्राजक्ता गोरख महाजन यांना मिळाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हेमंत पाटील, सहायक डॉ. मीना काळे, डॉ, बालाजी पवार, प्रा. एस. पी. वसावे व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.