अनाथ मुला मुलींचे बालगृहात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन. .
खडके ( एरंडोल ) : प्रजासत्ताक दिनानिमित्त कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला मुलींचे बालगृहात
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि कल्पना हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमातून संस्था अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसाठी आणि मुलींसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले यावेळी बालगृहातील सर्व दाखल मुला मुलींचे डोळे तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आला तसेच संस्थेतील बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या प्रथमोपचारा साठी गोळ्या औषधींचे किट देखील देण्यात आले याप्रसंगी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ;श्री राहुल पाटील ;श्री बाळा राजपूत तसेच कल्पना हॉस्पिटलचे नंदू पाटील; गौरव पाटील उपस्थित होते