पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू…..
एरंडोल प्रतिनिधी – येथील रेशन दुकानदार देविदास जोशी उर्फ बंडू जोशी ( वय ६२ वर्षे ) हे २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११.०० वा. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता ते परत न आल्याने त्यांचा मुलगा वडिलांना पाहण्यासाठी गेला असता त्याला वडिल वापरत असलेली मोटर सायकल दिसून आली.
आजूबाजूला असलेल्या शेतामधील लोकांना विचारपूस केली असता काही माहिती न मिळाल्याने त्यांच्या मुलाने त्याचा चुलत भाऊ भूषण जोशी व मित्र संदीप जैन यांना बोलावून घेतले व शोध घेत असताना विहिरीजवळ चिखल असल्याने त्या चिखलात पाय घसरल्याचे दिसल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता बॅटरी चमकत असल्याचे दिसल्याने आजुबाजुच्या शेतातील लोकांना आवाज देऊन बोलवून पाहिले असता विहिरीत बिलाई टाकून पाहिले असता जोशी हे बिलाई मध्ये अडकल्याने त्यांना लोकांनी बाहेर काढून खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करून पुढील तपास करीत आहे.