औद्योगिक बहुउददेशिय कारागीरांची सहकारी ग्रामोद्योग संस्था मर्या . चेअरमनपदी…
एरंडोल – येथील औद्योगिक बहुउददेशिय कारागीरांची सहकारी ग्रामोद्योग संस्थेची बैठक नुकतीच संंपन्न झाली. यावेळी चेअरमनपदी विद्यमान संचालकांमधून गोविंदा देशमुख यांची तर व्हा.चेअरमनपदी सिताराम मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी साळुंखे मॅडम होत्या. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी दोन अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
संचालक रमेश राजाराम महाजन, राजेंद्र जाधव, अलकाबाई माळ,ी प्रभाकर सोनवणे, पवन भोई, भिका ठाकूर, पुनमचंद कुंभार, दत्तू मिस्तरी, सचिव संजय विसपुते, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते. नवनियुक्त चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचे संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.