संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
एरंडोल- उत्राण (ता.एरंडोल) येथील सत्यशोधक महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित श्री.सुरेशचंद बी.संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उतासाह्त संपन्न झाले.वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी,संस्थेच्या सचिव शीतल माळी,केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य mathu अब्राहम यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.स्नेहसंमेलनाचे नियोजन दोन भागात करण्यात आले होते.यामध्ये प्रथम भागात विद्यार्थ्यांनी बॉलीवूड चित्रपटातील विविध कलावंतांच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.
तर भाग दोन मध्ये अनमोल मोती या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्राचीन काळातील समुद्र मंथनातून अनमोल रत्न बाहेर पडले त्या अनुषंगातून आधुनिक काळातील लोकमान्य टिळक,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,सचिन तेंडूलकर,दादासाहेब फाळके यांच्या जीवनपटावर आधारित विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेल्या कार्यक्रमास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी उपस्थित विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.सर्व कार्यक्रमात शाळेतील सुमारे सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते.सातशे विद्यार्थ्यांनी मंचावर येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य सादर करताच एकाचा जल्लोष करण्यात आला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अध्यक्ष देवमाण माळी यांनी सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरु करून मोठी संधी उपलब्ध करून दिली असून विद्यार्थी आणि पालक यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.शाळेसाठी चार हायमास lamp देण्याची घोषणा त्यांनी केली.यावेळी कासोदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे,प्राचार्य अब्राहम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी वर्षभरातील विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि बुद्धिमत्ता कौशल्य याचे परीक्षण करून उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी यांनी प्रास्ताविक केले.श्री.कांबळे सर यांनी सुत्रसंचलन केले.प्राचार्य उमाकांत बुंदेले यांनी आभार मानले.संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी,सचिव शीतल माळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमास सावता माली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,राजेंद्र महाजन,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,शिंदे स्कूलचे प्राचार्य विजय पाटील,अशोक पाटील,गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूलचे अध्यक्ष युवराज सावंत,उत्राण अहिरहद्दचे उपसरपंच हारून देशमुख,गुजरहद्द्चे उपसरपंच वाल्मिक कोळी,जनता बँकेचे व्यवस्थापक विलास मते यांचेसह पालक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमासाठी भूषण पाटील,गणेश महाजन,भागवत माळी,पूनम पाटील,श्रद्धा पिंगळे,शुभांगी पिंपळकर,भावना पाटील,कोमल पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.