छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला; पुण्याशी होतं कनेक्शन

Screenshot_2023-02-08-18-37-45-77_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg

उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन होजे येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्‍‌र्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

शहरातील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून या उद्यानातून हा पुतळा कधी चोरी झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही, असे स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी केटीव्हीयूने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळ्याचे पुण्याशी कनेक्शन होते. उत्तर अमेरिकेतील सॅन होजे हा शहराला हा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

या पुतळ्याच्या चोरीमुळे शहरवासीयांना खूप दुःख झाले आहे, असे विभागाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुतळ्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न काम करत आहोत आणि लवकरच याबद्दल अपडेट देऊ. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि या कामात नागरिकांची मदत घेतली जात असल्यचे विभागाच्याअधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!