न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विज्ञान दिवस संपन्न
एरंडोल – ए.शि.प्र.मं.संचलीत न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 28 फेब्रुवारी नामवंत वैज्ञानिक सी व्ही रमण जयंती व विज्ञान दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमा प्रसंगी प्रिन्सिपल सौ सरला विंचूरकर व उप प्रिन्सिपल सरीता पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती व सी व्ही रमण याच्या प्रतीमांचे पूजन करण्यात आले नंतर शाळेतील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले तर शाळेतीला काही विद्यार्थ्यांनी विज्ञान दिना विषयी माहीती दिली तर या विद्यार्थ्यांना नृत्य मार्गदर्शन व कार्यक्रमाची तयारी विज्ञान शिक्षक राधा बोरसे, करिश्मा मँडम, किरण महाजन, मयुरी बिर्ला यांनी केले .तसेच शाळेच्या प्रिन्सिपल सरला विचुरकर व्हाईस प्रिन्सिपल सरीता पाटील , बोरसे मॅडम, किरण महाजन सर, सीमा मॅडम यानी आपली मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दीक्षा ठाकूर व आभार मयुरी पाटील या विद्यार्थींनीनी केले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या विज्ञान विभागाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती