एरंडोल येथील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड
एरंडोल:-येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या दोन खेळाडूंची कुस्ती व जुडो राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे१९ वर्षा आतील गटात कुमारी प्रेरणा अनिल मराठे हीची कुस्ती व जुडो या दोन्ही स्पर्धांसाठी निवड झाली आहे. तसेच १४ वर्षा आतील गटात जुडो स्पर्धेत चेतन दिलीप सोनवणे याने नाशिक विभागातून ५० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्य स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे
गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे अनिल मराठे, दिलीप पैलवान यांचे दोन्ही खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.