शासकीय खरेदी प्रक्रियेला अखेर सुरुवात……
अमळनेर : नाफेड अंतर्गत शासकीय चना (हरभरा ) खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रावर नोंदणीला सुरुवात करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकारी जी एन मगरे यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात शेकी संघ अमळनेर ,पारोळा ,चोपडा , एरंडोल केंद्रांतरगत धरणगाव व कासोदा खरेदी केंद्र , पाळधी फ्रुटसेल सोसायटी ,जळगाव शेतकी संघ अंतर्गत म्हसावद खरेदी केंद्र , जळगाव औद्योगिक कृषी सेवा केंद्र , भुसावळ ,कोरपावली सोसायटी ला यावल खरेदी केंद्र , रावेर ,मुक्ताईनगर , बोदवड को ऑप परचेस सेल, जामनेर ,पाचोरा ,भडगाव , चाळीसगाव शेतकी संघ या सतरा केंद्रांवर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
हरभरा साठी ५३३५ रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही . येत्या पंधरा दिवसात खरेदी सुरू होईल.
शेतकऱ्यांनी पीक पेरा लावलेला सातबारा उतारा,आधार कार्ड , बँकेचे पासबुक ,फोन नम्बर आदी कागदपत्रे स्कॅन करावी. ऑनलायीन पद्धतीने नोंदणी होणार असून रोजच्या रोज क्रमाने नावे नोंदली जातील.-संजय पाटील ,व्यवस्थापक ,शेतकी संघ ,अमळनेर