एरंडोल येथे मोटार सायकल चोरी प्रकरणी एका सोबत दोन पोलिसांना अटक.
प्रतिनिधी – एरंडोल येथील तिन मोटार सायकल चोरी प्रकरणी एरंडोल पोलिसांनी एका संशयित आरोपी सोबत दोन संशयित पोलिसांना अटक केली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनवरून मिळालेल्या माहिती नुसार दि.१०/०७/२०२० रोजी रात्री ११ ते ११/०७/२०२० च्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान एरंडोल येथील लक्ष्मी नगर मधील शिक्षक संजय रमेश पाटील यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.१९ बी.एक्स.६५९२ चोरली असल्याची फिर्याद एरंडोल पोलीस स्टेशनला दिली होती.त्यानुषंगाने जळगाव एल.सी.बी.पथकाने धुळे येथुन संशयित आरोपी म्हणुन जुबेर रशीद पठाण ऊर्फ बबलु ( वय ४०) प्लॉट नं.१५ ,रा. चाळीसगाव रोड समर्थ कॉलनी धुळे यास अटक केली व त्यास एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले असता त्याला ६ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी मध्ये ठेवण्यात आले असुन त्याच्या सोबत संशयित आरोपी म्हणुन रफिक रशिद पठाण धुळे एल.सी.बी. व राहुल सानप धुळे एल.सी. बी.यांना देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तिघांकडे तिन मोटार सायकली अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपयांच्या जप्त करण्यात आल्या आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ.संतोष चौधरी करीत आहे.