नगाव खुर्द येथे वीज पडून तरुणीचा मृत्यू
प्रतिनिधी अमळनेर :- शेत मजुरी साठी कामाला गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना नगाव खुर्द येथे सायंकाळी 5 ते साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत असे की,नगाव खुर्द येथे परराज्यातून शेतीच्या कामासाठी कुटूंबासह आलेली निरगली मुका पावरा (वय 17) वर्ष ही दि.19 रोजी शेत कामासाठी मजुरीने गेली होती.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगाव खुर्द परिसरात विजेच्या गडगडाट सह वादळाला सुरुवात झाल्याने तीन ते चार जण निरगली सोबत ही नगाव खुर्द येथे घराकडे जायला निघाली. नगाव खुर्द शिवारातील गजानन उत्तम पाटील यांच्या शेताजवळील रस्तावर मात्र चालतांना निरगली मागे राहिल्याने तिच्यावर जोरदार वीज कोसळली.त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.याबाबत महसूल विभागाने पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला.याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.