भेसळयुक्त पनीर कसे ओळखायचे? जाणून घ्या सोप्या पद्धती
भेसळयुक्त पनीर घरी घेऊन जात असताना ती खरी आहे की नाही हे लोकांना समजत नाही.आठवड्यातून कधी ना कधी प्रत्येक घरात पनीर बनवले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही जे पनीर अगदी आवडीने खात आहात त्यातही भेसळ असू शकते.
भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने आपले आरोग्य तर बिघडतेच पण आपण आजारीही पडू शकतो. सामान्य लोकांना ओरीजनल पनीर सहजासहजी ओळखता येत नाही. अशा वेळी सामान्य माणसाला खरे पनीर कसे ओळखता येईल असा प्रश्न पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि नकली पनीर सहज ओळखू शकाल.सर्वप्रथम पनीर घेताना पनीरचा तुकडा क्रश करावा लागेल. जर पनीर क्रॅश केल्याने फुटू लागले तर ते नकली पनीर आहे असे समजावे.
पनीर ओळखण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे ते उकळण्यासाठी पाण्यात टाका. थंड झाल्यावर पनीरमध्ये सोयाबीन किंवा तूर डाळ पावडर घाला आणि 10 मिनिटे राहू द्या.
जर पनीरचा रंग हलका लाल होऊ लागला तर ते पनीर डिटर्जंट किंवा युरियापासून बनवलेले आहे असे समजा आणि ते विकत घेऊ नका.
ओरीजनल पनीरचा दुधासारखा वास येतो, तर नकली पनीरला वास नसतो किंवा आंबट वास येतो.