राष्ट्रीय साहित्य संघाच्या अध्यक्षपदी मंगलाताई रोकडे.
प्रतिनिधी एरंडोल – येथील ज्येष्ठ कवयित्री मंगलाताई रोकडे यांची राष्ट्रीय साहित्य संघाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी कवी भीमराव सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारणी पुढीप्रमाणे कार्याध्यक्ष पी. जी. चौधरी, सचिव उर्दू भाषेचे प्रसिद्ध साहित्यिक सैय्यद झाकीर हुसेन,कोषाध्यक्ष सरिता रघुवंशी, प्रसिद्ध प्रमुख निंबा बडगुजर,सहसचिव भागवत सूर्यवंशी,तर सदस्यपदी ज्येष्ठ लेखिका, कवयित्री शकुंतला पाटील रोटवदकर , कादंबरीकार विलास मोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा.ना. आंधळे, सौरव वैद्य ( सोंनबर्डी), लताताई सुतार, आदींची निवड करण्यात आली. या संघातर्फे नवोदित कविंसाठी कवितेची कार्यशाळा, मासिक कवी संमेलन, नवोदित साहित्यिकांच्या प्रथम पुस्तकास अनुदान देणे, राज्यस्तरावर सावित्री ज्योतिराव साहित्य संमेलन घेणे,आदी अनेक साहित्यिक उपक्रम राबविणार असल्याचे साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण आधार महाजन यांनी कळविले आहे.