धक्कादायक ! शिक्षिका ओरडली म्हणून विद्यार्थ्याचा वर्गातच तिच्यासोबत VIDEO VIRAL
नवी दिल्ली – कुणीही आपल्याला ओरडलं की त्याचं वाईट वाटतं, काही जणांना तर रागही येतो. पण काही लोकांचा हा राग इतका टोकाला जातो की ते धक्कादायक पाऊल उचलतात.असाच एक शॉकिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शिक्षिका ओरडली म्हणून एका विद्यार्थ्याला इतका राग आला की त्याने वर्गात तिच्यासोबत भयानक कृत्य केलं. भारतात शिक्षक म्हणजे गुरूला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. गुरूचा आदर करावा हे लहानपणापासूनच शिकवलं जातं.
पण या विद्यार्थ्याने महिला शिक्षकासोबत जे केलं ते पाहून तुमचाही संताप होईल. शिक्षकासोबत असं कोणता विद्यार्थी करू शकेल, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडीओ पाहूनच तुमचा राग राग होईल. व्हिडीओत पाहू शकता एका वर्गात काही विद्यार्थी बसले आहेत.
एक विद्यार्थी शिक्षिकेसमोर उभा आहे. तो खूप रागात दिसतो आहे. शिक्षिका त्याच्यासोबत हसत बोलते आहे. त्याचवेळी विद्यार्थी असे काही हातवारे करतो की शिक्षिकेला राग येतो.
https://twitter.com/i/status/1643070887045005313
ती त्याला आपल्यापासून दूर ढकलते. त्यानंतर विद्यार्थी अधिकच संतप्त होतो आणि तो शिक्षिकेवर हल्ला करतोविद्यार्थी शिक्षिकेला ढकलत मागे नेतो आणि तिला मारहाण करतो. शिक्षिका स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिची सुटका काही होत नाही.
व्हिडीओचा शेवट तर यापेक्षाही धक्कादायक आहे. विद्यार्थी शिक्षिकेला धक्का देत जमिनीवर पाडतो आणि तिला लाथेनेही मारताना दिसतो.