डॉ.. विजय शास्त्री यांचे जि.एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा (म. प्र.) येथे प्रोत्साहनात्मक व्याख्यान. विजय शास्त्री यांचे जि.एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा (म. प्र.) येथे प्रोत्साहनात्मक व्याख्यान
एरंडोल: १० एप्रिल २०२३ रोजी शास्त्री फौंडेशन चे निर्माते, अध्यक्ष व शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी जि.एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा (म. प्र.) येथे प्रोत्साहनात्मक व्याख्यान दिले. यावेळी जि.एच रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मीना राजेश, कार्यक्रमाचे समन्वयक सौ. अनमोल धावंडे, कार्यक्रम प्रमुख डॉ. सुहास साकरकर उपस्थित होते.
या जीवनात सर्व गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात असतात त्यामुळे आपले ध्येय साध्य करताना संयम ठेवणे खूप गरजेच आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका, अपमान करणारच पण या सर्वात महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टीना Motivation बनवून Success मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो Successful होतो.
यावेळी बोलताना डॉ शास्त्री म्हणाले की जीवनात अडथळेही आवश्यक आहेत. जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगाने धावायला सुरुवात करू आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू. लाल सिग्नल लागल्यावर थांबणे आवश्यक आहे, पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक जाम पासून वाचू शकतो. गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपला दुर्घटना होण्यापासून बचाव करतात. तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपली असंविधानिक व अनैतिक कामे करण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. कोणते ना कोणते भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमांचे पालन करून चांगले नागरिक बनतो. तसं पाहता आपण जीवनात अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो तर आपण किती पळू शकणार आहोत? असेही ते म्हणाले.
डॉ शास्त्री यांनी मजेशीर उदाहरणे देत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. धावल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे. आता विश्रांती घ्यावी असे ठरवणेही गरजेचे आहे. काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखर आगेकूच करू शकतो. यासाठी विश्रामरुपी गतिरोधक आवश्यक आहे. जीवनात सतत काम करत राहाल, पैसेही कमवाल पण शारीरिक स्वास्थ, मानसिक सर्तकता व भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास सतत तणाव आणि चिंतेने ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही? जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे. जीवनात विविध प्रकारचे अडथळे किंवा बाधा संतुलन मिळविण्याच्या संधी प्राप्त करून देत असतात. हे अडथळे सांगत असतात की, जीवनात बाहेरील अडथळ्यांशिवाय अंतर्गत अथवा मानसिक अडथळ्यांना दूर करणे किती महत्त्वाचे आहे असे ते बोलले.
आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की, आपण किती अडथळे पार केले. अडथळेरहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगलं आहे कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हांनाशिवाय आपण कोणताही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्याच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुर्नमूल्यांकन करण्याची संधी देत असतात असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानादरम्यान व व्याख्यान नंतर विद्यार्थ्यांनी आपले करिअर साध्य करताना काय अडचणी येतात व ते दूर कसे करायचेत यावर चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अनमोल धावंडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. सुहास साकरकर यांनी केले.