सरकारी कामात अडथळा २६ जणासह अज्ञात १५० लोकांवर गुन्हा दाखल.
अमळनेर : अक्षय भिल याच्या मृत्यूच्या निषेधार्थ २५ रोजी महाराणाप्रताप चौकात रास्ता रोको करून सामान्य जनतेला वेठीस धरणे ,विशिष्ट समाजाला अश्लील शिवीगाळ करणे या सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या २६ जणासह अज्ञात १५० लोकांवर दंगल ,सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ भिल समाजाने महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. तसेच टायर जाळले आणि सामान्य नागरिकांना दादागिरी करून त्यांचे रस्ते अडवले. यामुळे अनेकांना त्रास झाला. पोलिसांची गाडी देखील आंदोलन कर्त्यांनी अडवली होती. आंदोलनात धुळे ,शिंदखेडा ,पारोळा ,चाळीसगाव , अमळनेर ग्रामीण भागातून देखील भिल समाज एकत्र झाला होता. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यामुळे पोलीस प्रशासन तर्फे पोलीस नाईक दीपक माळी यांनी फिर्याद दिली की विकास भिल ,गणेश त्र्यंबक भिल ,त्र्यंबक राजाराम भिल रा पाईप फॅक्टरीजवळ , भैय्या भिल रा हिवरखेडा ता पारोळा , विजय दादा भिल रा बंगाली फाईल , विनोद भिल रा अवधान ता धुळे , रवींद्र भिल ,जापी शिरडाने ,धुळे , लक्ष्मण भिल, डांगरी , उमेश भिल ,राजमाने ता चाळीसगाव , सुरेश मोरे ,युवराज मोरे , श्यामदेव मोरे ,नामदेव मोरे ,नरेश भिल रा पिंपळे रोड अमळनेर , रवी सोनवणे ,रमेश सोनवणे रा ताडेपुरा ,पैलाड , अनंत पवार रुबजी नगर , बापू भिल रामवाडी , गुलाब बोरसे रा हिंगोणे , राजू भिल दाजीबा नगर, युवराज भिल रा राजाराम नगर , किरण सोनवणे ,गलवाडे रोड , मगन रूपंचंद भिल रा सात्री , रवी सुखदेव मालचे रा बोहरा , रतीलाल शेनपडू भिल रा कलंबू यांनी बेकायदा मंडळी जमवून एस टी वर दगडफेक , आरोपीच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले , एका समाजाला शिवीगाळ केली. या साऱ्या घटनेचे पोलिसांनी व्हीडिओ चित्रीकरण करून घेतले आहे. म्हणून वरील सर्व आरोपी व यांच्यासह अज्ञात आरोपी असे एकूण १५० लोकांवर सरकारी कामात अडथळा , जिल्हाधिकारीच्या ३७(१) चे उल्लंघन , दंगल , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ,रस्ता अडवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.