अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई..

Picsart_23-05-18_10-28-11-384.jpg

अमळनेर : महसूल विभागातर्फे अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर कारवाई केली असून ७ लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत.
गोपाळ किसन पाटील यांचा टेम्पो क्रमांक एम एच ०५ एजी ६३८१ , संदीप जगन्नाथ पारधी यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ सी जे १४०२ , ट्रॉली क्रमांक एम एच १९ ,५९५८ राहुल काशिनाथ शिंपी यांचे टेम्पो क्रमांक एम एच ०२ , एच ए ६२६५ , भूषण दिपक धनगर यांचा टेम्पो क्रमांक एम एच ०५ , ९१२२ , जयेश युवराज पाटील यांचा लाल रंगाचा बिना नंबरचा टेम्पो , ललित कैलास पाटील एम एच ०१ एल ए ३०३३ , मुनाफ पठाण यांचे ट्रॅक्टर एम एच १९ , बी जी ५४० ट्रॉली क्रमांक एम एच १९ इ ३४२३ , विश्वास संतोष पाटील यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ , बिजी ६४०२ , अकबरखा युसुफखा पठाण यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच २१ ए डी ३७८५ , भैय्या शांताराम पाटील यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ , ए एल ४४६० , आकाश शिंपी यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ ,सी इ १६७६ ,धनराज मधुकर पाटील यांचा बिना नंबर टेम्पो , हेमंत राजेंद्र पवार यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ , सी यु १७४७ , शेख वहाब गफूर यांचा टेम्पो क्रमांक एम एच ०२ ,बी ९९०७ , मुकद्दर अली जोहर अली एम एच ०२ वाय ३४८१ या वाहनांना अवैध वाळू वाहतूक व गौण खनिज वाहताना तलाठी पथकाने रंगेहाथ पकडून वाहने पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आले आहेत. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सर्व वाहनांना एकूण सात लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस दिली असून तीन वाहनांनी दंड भरल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!