एरंडोल नगर परिषदेत मेरी लाईफ ,मेरा स्वच्छ शहर अभियानाची सुरुवात
एरंडोल – स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या (MoHUA) ” मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर” हे अभियान राबविले जात असून या अभियानांतर्गत एरंडोल नगरपरिषद कार्यालय परिसरात RRR म्हणजेच (रिड्यूस, रियुझ, रिसायकल) केंद्र स्थापन करण्यात आले आहे. RRR केंद्राचे उद्घाटन प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.केंद्रामध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा ग्रुप तय्यार करण्यात आला आहे.तरी, एरंडोल शहरातील नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, आपल्या घरातील वापरात नसलेल्या किंवा अनावश्यक वस्तू जसे की, वापरलेल्या चप्पल वा बूट, वापरलेले कपडे, वापरलेली पुस्तके, वापरलेली खेळणी इ. वस्तूंचा पुनर्वापर केला जाणार असून कचरा कमी करण्याच्या उद्देशाने RRR केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर केंद्रात वस्तू संकलनाची वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ वाजेपर्यंत आहे. केंद्र दि. २०/०५/२०२३ ते दि. ०५/०६/२०२३ या कालावधीसाठी कार्यान्वित करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे RRR बाबत मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच वापरात नसलेल्या वस्तू देणाऱ्या नागरिकांचा नगर परिषदेमार्फत कापडी पिशवी व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नगर पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.