…या प्रेमप्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा…
उत्तर प्रदेशात – रामपूर येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला आणि इकडे पत्नीचे दिरासोबत सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या अन् एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दीर-वहिनीने एके दिवशी अंधाराच्या फायदा घेत घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. विषेश म्हणजे दोघांनीही तीन-तीन मुले आहेत.
ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर येथील आहे. दोघांनी अंधाराच्या फायदा घेत घरातून पलायन केले. या प्रेमप्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा होत आहे.
गावातील विवाहित महिलेचे तिच्याच मोठ्या दिराशी प्रेमसंबंध जुळलं. या महिलेला तीन मुले आहेत आणि तिच्या दिरालाही तीन मुले आहेत. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की महिलेच्या पतीलाही याचा सुगावा लागला नाही. महिलेने दिरासोबत राहण्याचा निर्णय घेतला व त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
दोघे पळून गेल्यानंतर महिलेच्या पतीने आणि नातेवाईकांनी दोघांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. शनिवारी दुपारी महिला आणि तिचा दीर गावातील पोलीस ठाण्यात आले. याची माहिती मिळताच महिलेचा पती, मुले व नातेवाईकही पोलीस ठाण्यात आले. महिलेच्या पतीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण दिराच्या प्रेमात वेडी झालेली महिलेने तीन मुलांना सोडून दिरासोबत राहण्याचा निर्णय घेतला.दिरानेही पत्नी व मुलांना सोडून भावजयीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दोघांना जमजावण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर पोलीस व नातेवाईकांनी त्यांना एकमेकांसोबत राहण्याची परवानगी दिली.