अग्निवीर योजनेविषयी १५ रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र.
जळगाव – जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १५ जुलै रोजी संरक्षण क्षेत्रातील अग्निवीर योजनेविषयी मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे .
दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात https://meet.google.com/tke-rgrx-hba या लिंक वर जाऊन सहभागी व्हावे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक अनुरथ वाकडे हे ‘अग्निवीर’ योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. या मार्गदर्शन सत्राचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.