पेन्शन अदालतीचे २० जुलै रोजी आयोजन
प्रतिनिधी – जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजून घेण्यासाठी २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जळगाव डाकघरचे अधीक्षक बी.व्ही.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या तक्रारींचे निवारण सहा आठवढयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दखल घेण्यात येणार आहे. टपाल विभागातून निवृत झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालत मध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे जसे वारस इ. तसेच नीती आधारित सूचना / तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही. असे ही श्री.चव्हाण यांनी सांगितले आहे.