एरंडोल येथे पोळा सण उत्साहात साजरा

IMG-20230914-WA0185.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतकरी पावसात आनंदाने न्हाऊन निघाला व आपल्या बळीराजाला सजविण्यासाठी उतावीळ झाला. दुपारी शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजाची पूजा करून त्यांना सजवून ढोल ताशांच्या गजरात गावात मिरवणूक काढून उत्साहात पोळा सण साजरा केला. त्याचप्रमाणे सालाबादा प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रल्हाद पितांबर महाजन या शेतकऱ्याने आपल्या बळीराजाला सजवताना माहिती अधिकार कायद्याच्या जनजागृती व्हावी यासाठी बैलांच्या खांद्यावर फलकाच्या झूली बनवून २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करावा , माहिती अधिकाराचा एक अर्ज करा चटकन माहिती मिळवा पटकन , लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ , दप्तर दिरंगाई २००६ या आशयाचे फलक बनवून पूर्ण गावात माहिती अधिकार विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी आपल्या बळीराजांना घेऊन पूर्ण गावात फेरफटका मारला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!