एरंडोल येथे नागराज मित्र मंडळातर्फे २४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना .
एरंडोल:- येथे प्रति वर्षाप्रमाणे १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे.
एकंदरीत सर्व मंडळांनी गणेश मूर्तींच्या उंचीवर भर दिलेला दिसून येतो. नागराज मित्र मंडळाची मूर्ती ही २४ फुटा पेक्षा जास्त उंचीची आहे. सर्वोदय गणेश मंडळाची गणेश मूर्ती १९ फूट उंच आहे. तर मानाचा गणपती जय गुरु व्यायाम शाळेचा हा सुद्धा ११ फूट उंच आहे. संत सावता माळी व्यायाम शाळेची गणपती मूर्ती १८ फूट उंचीची आहे. गणेश उत्सवानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे तसेच चिमूरड्यांच्या आनंदालाही उधान आलेले आहे.
एरंडोल येथे दहा दिवसाचा गणेश उत्सव साजरा केला जातो विशेष हे की यावर्षी एरंडोल पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रात एक गाव एक गणपती ही संकल्पना कुठेही राबविण्यात आली नाही.
दहा दिवसात मंडळातर्फे रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अजून कोणत्याही मंडळाकडून आरास उघडण्यात आलेली नाही. आरास च्या माध्यमातून जातीय सलोखा दर्शन, स्त्री शिक्षणाचा प्रसार, विविध विषयांवर जनजागृती यावर भर दिला जातो.
गेल्या वर्षी सुद्धा भव्य व उंच मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. दहाव्या दिवशी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्त्या ट्रॅक्टरवर सजवून आरासह सामूहिक मिरवणूक वाजत गाजत काढून जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते गणेश उत्सव काळात सक्रिय दिसून येतात संघटन कौशल्य नेतृत्व गुण यांची प्रचिती गणेश उत्सवातून दिसून येते…