एरंडोल येथे अभिलेख तपासणीत आढळून आल्या ७५५१ कुणबी नोंदी.
प्रतिनिधी – एरंडोल येथील तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणीत एकुण ७५५१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
तहसील कार्यालयातील ५ मंडळ अधिकारी व १५ तलाठी यांनी दि.८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या तिन दिवसांच्या कालावधीत एकुण १ लाख ६३ हजार ४३८ नोंदी तपासण्यात आल्या यात ० मराठा,०मराठा कुणबी व ७५५१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे.या नोंदी १९५० पुर्वीच्या असल्याचे तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.