मतदारांची सेवा करण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार-डॉ.संभाजीराजे पाटील.

IMG_20231210_115735.jpg

एरंडोल-मतदारांची सेवा करण्यासाठी एरंडोल विधानसभा मतदार संघातून अपक्ष
निवडणूक लढवणार असल्याचे डॉ.संभाजीराजे पाटील फाउंडेशनचे संस्थापक
अध्यक्ष डॉ.संभाजीराजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अपक्ष
निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मतदारसंघात योग्य नियोजन सुरु असल्याची
माहिती त्यांनी दिली. डॉ.संभाजीराजे पाटील फाउंडेशनच्यावतीने मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी सुरु केला आहे.

डॉ.संभाजीराजे पाटील यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय पक्षाकडे प्रयत्न सुरु आहेत का असे विचारले असता योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल मात्र सद्यस्थितीत अपक्ष म्हणूनच नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी संख्या असल्यामुळे अपक्ष उमेदवार हाच पर्याय असल्याचे सांगून त्यांनी कोणत्याही पक्षाकडे अद्यापपर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी संपर्क साधलेला नसल्याचे स्पष्ट केले.मतदारसंघात नवीन औद्योगिक वसाहत
सुरु करणे,बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना सुरु करणे,शेतक-यांच्या
जीवनात हरितक्रांती घडवणा-या नारपार योजनेचा प्रश्न मार्गी लावणे हे तीन
प्रमुख उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास मतदारसंघातील अनेक
बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी
सांगितले.मतदार संघात रुग्णसेवेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना
अल्पदरात उपचारासाठी मदत केली असून आता मतदारांची सेवा करण्यासाठी राजकीय
क्षेत्रात प्रवेश करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे
सांगितले.राजकीय क्षेत्रात नवीन असलो तरी विविध उपक्रमांच्या माध्यमातून
माझे कार्य मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचले असल्याचे
त्यांनी सांगितले.सामाजिक व वैद्यकीय उपक्रम मतदारसंघात राबवल्यामुळे
सर्व गावांमध्ये युवकांचे संघटन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी
सांगितले.स्वता:च्या स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघातील सर्वसामान्य
मतदार,शेतकरी,शेतमजूर,महिला यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी
आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे
त्यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण घेत असतांना गरीब विद्यार्थ्याना
होणारा त्रास आणि त्यांच्यासमोर उभे राहणारे आर्थिक संकट याचा अनुभव
स्वता:ला असल्यामुळे हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांना देखील उच्च शिक्षण
घेता यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आगामी काळात
मतदारसंघात आयोजित करण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी
दिली.यावेळी डॉ.महेश पाटील,बापूसाहेब पाटील यांचेसह फाउंडेशनचे पदाधिकारी
व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!