बालविवाह निर्मुलन जनजागृती रॅलीचे आयोजन
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खर्ची बु.येथे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र जळगाव अंतर्गत खर्ची बु गावातील नुतन माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा व आत्मनिष्ठ युवती मंडळ खर्ची बु यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त जनजागृती अभियान’ अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
युनिसेफ व एस.बी.सी – ३ सक्षम प्रकल्प यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्याभरात बाल विवाह मुक्त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दि.९ डिसेंबर रोजी गावातून जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेवुन बालविवाह निर्मूलन करण्याचे ठरविले.
यावेळी नुतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निखिल महाजन , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जि. प. शाळेचे प्र मुख्याध्यापक सुखदेव पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आत्मनिष्ठ युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश माळी व नेहरू युवा केंद्राचे समन्वयक मुकेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, सक्षम प्रकल्प जिल्हाप्रमुख नंदु जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते.