शेतात ठेवलेल्या ४५ हजार रुपये किमतीची आसारी अज्ञात चोरांनी पळविली
एरंडोल:- तालुक्यातील रिंगणगाव येथे आशिष राजेंद्र महाजन यांनी रिंगणगाव शिवारात निम्मे हिस्सा ने शेत केलेले असून त्या शेतात शेड बांधण्यासाठी १२ डिसेंबर रोजी नऊ क्विंटल आसारी विकत घेऊन शेतात टाकली.१६ डिसेंबर रोजी सदर आसारीवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याचे आढळून आले.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यां विरुद्ध १७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.