ट्रकच्या धडकेत दुचाकी वर बसलेला वेल्हाणे तालुका जिल्हा धुळे येथील युवक जागीच गतप्राण दुचाकी चालक जखमी….

IMG-20231217-WA0151.jpg

एरंडोल;-एरंडोल कडून भडगाव कडे जाणाऱ्या दुचाकीला भडगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून कट मारल्याने दुचाकी वर मागे बसलेला अरुण काळू मराठे राहणार वेल्हाणे, वय ३९ वर्ष तालुका जिल्हा धुळे
हा रस्त्यावर खाली पडला व ट्रकचे मागील सांग त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला ही घटना १७ डिसेंबर २०२३ रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास खडके खुर्द पासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोल कासोदा रस्त्यावर घडली.
अनिल रघुनाथ पाटील व अरुण कळू मराठे हे दोघे एम एच १८ बी डब्ल्यू १८३६ क्रमांकाच्या बजाज कंपनीच्या दुचाकीने अरुण मराठे याच्या नातेवाईकाच्या लग्नात जळगाव येथे गेले लग्नाला हजेरी लावून साधारणपणे दीड वाजेच्या सुमारास ते अनिल पाटील यांच्या बालवाडी तालुका भडगाव येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर भडगाव कडून येणाऱ्या एम एच १८ बीजी ३२४० क्रमांकाच्या ट्रकने कट मारला त्यामुळे मागे बसलेला अरुण मराठे हा रस्त्यावरून खाली फेकला गेला व ट्रकचे मागील सात त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. अनिल पाटील हा दुचाकी चालवत होता. या दुर्घटनेत अनिल पाटील सुद्धा जखमी झाला या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय विकास देशमुख किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत

About Author

You may have missed

error: Content is protected !!