एरंडोल येथे अगम काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी.. , बंद घरातून अज्ञात चोरांनी केली चोरी
एरंडोल: येथे अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलो चे ५ काजू चे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला.
एरंडोल येथे जळगाव रस्त्यालगत असलेल्या अगम कॅश्यू कॉर्पोरेशन नामक काजू च्या कारखान्यातून एम.एच.१९ सी.वाय.६७९७ क्रमांकाच्या वाहनात ठेवलेल्या ९५हजार रुपये किंमतीच्या काजू चे ५ खोक्यांवर अज्ञाट चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना २४डिसेंबर २०२३ रोजी रात्री घडली.
याप्रकरणी पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सुनिल लोहार हे करीत आहेत.
मधूकर नगर येथील बन्सीलाल श्रावण पाटील हे बडोदा येथे मुलांकडे गेले असता अज्ञात चोरांनी घराच्या मागील लोखंडी दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉड ने तोडून लाकडी दरवाजा सुध्दा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त पसरवून , गोदरेज कपाट फोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. अज्ञात चोरांनी काय चोरून नेल्याचे समजू शकले नाही.