सम्यक इंग्लिश मिडीयम स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन फार मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी – सम्यक फाऊंडेशन संचलित सम्यक इंग्लिश मिडीयम स्कुल,एरंडोल चे वार्षिक स्नेह संमेलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडले.दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षाची सुद्धा आगळी वेगळी थीम होती, स्नेह संमेलनाची थीम ही माणुसकी आणि मैत्री अशी होती तर समाजात माणुसकी आणि मैत्री जपणारी माणसे संपूर्ण जिल्हाभरात त्यांनी शोधली व अशाच व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी खानदेश चे सुपुत्र राजेश पाटील सर तसेच संस्थेचे सचिव डॉ. संग्राम पाटील (UK) हे आमंत्रित होते. त्याचप्रमाणे प्रणाली सिसोदिया वर्धिष्णू च्या संस्थापिका की जे विशेष करून कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतात व त्यांना एक सुजाण नागरिक म्हणून घडवण्याचे काम करतात.तसेच सहवास चे संस्थापक समाधान सावंत जे की अंध,अपंग मतिमंद व गतिमंद अशा मुलांचा सांभाळ वनकोठे या गावी सहपरिवार सहकुटुंब करत आहेत. त्याचप्रमाणे अण्णा म्हणून कासोद्याला मोफत शिकवणी घेणारे आदर्श असे व्यक्ती हेही विशेष आमंत्रित होते की जे जवळजवळ 110 विद्यार्थी सध्या कासोदा शहरातील कृष्ण मंदिर येथे नवोदय व इतर शिकवणी घेण्याचे काम करत आहेत.त्याचप्रमाणे सत्कारार्थी म्हणून दत्त हॉस्पिटल चे डॉ देवेश वाघ व गोकुळ पाटील व कल्पना पाटील उपस्थित होत्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील मॅडम यांनी राजेश पाटील साहेबांचा सत्कार केला व त्यानंतर राजेश पाटील साहेबांनी व डॉ. संग्राम पाटील यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले .