अरे हे काय ? एकाच नंबरचे दोन वाहन……..
एकाच मालीकेची नंबर प्लेट लाऊन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल..!
एरंडोल: अशोक लेलँड कंपनीचा ट्रक चा नंबर दुसऱ्या वाहनावर लाऊन वापर केल्या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे सारवे येथील महेश गबरू राठोड यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली असून त्यांच्याकडे अशोक लेलँड कंपनीची बी.एस.४. ३७१८ ट्रक क्रमांक एम.एच१८ बी.जी.५१६० असा आहे.
१५ जानेवारी २०२४ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास सदर क्रमांकाच्या ट्रक वरील चालक शालिक मधुकर चव्हाण यांना आपल्या गाडीच्या नंबर सारख्याच नंबर ची गाडी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उपसरपंच चहा नजीक आढळून आली. लागलीच चालकाने मालक राठोड यांना याबाबत कळवले. एरंडोल पोलिस स्टेशन ला कळविण्यात आले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता सदर वाहनात लाकडे भरलेली होती. ते वाहन एरंडोल पोलिस स्टेशन ला नेण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुनील लोहार, अकील मुजावr व किरण पाटील हे करीत आहेत.