एरंडोल मनसे तर्फे कारसेवकांचा सत्कार.
प्रतिनिधी – एरंडोल येथिल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रामलल्ला प्रतिष्ठापणा पार्श्वभूमीवर शासकीय विश्राम गृह येथे शहरातील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रारंभी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळीं कारसेवक माजी नगरसेवक जगदिश ठाकूर, मोहन चव्हाण यांनी आपल्या भाषणातून कारसेवेच्या वेळी आलेले अनुभव सांगितले व कार सेवकांचा सत्कार केल्या बद्दल मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार यांचे आभार व्यक्त्त केले.
यानंतर कारसेवक जगदिश ठाकूर, मोहन चव्हाण,जिल्हानियोजन समितीचे सदस्य डॉ.सुरेश पाटील,भिका वाणी, सुरेश खुरे, सतिष पल्लीवाल, माधव जगताप,भिका भोई यांचा मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनसे तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील, उपशराध्यक्ष जगदीश सुतार, बापूसाहेब पाटील,आबा पाटील,विनायक देसले,मोहन मराठे,अशोक सुतार,गुलाब भोई यांची उपस्थिती होती.