जिल्हाधिकारी यांनी केला कासोदा येथील मधूकर ठाकूर यांचा प्रशस्तीपत्र देऊन केला सत्कार
प्रतिनिधी – दि.श. कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे मा. आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी हे मतदार जनजागृतीचा प्रचार व प्रसार कार्या निमित्ताने एरंडोल येथे आले असता त्यांनी कासोदा येथील ग्रामपंचायत कर्मचारी मधुकर जुलाल ठाकूर हे स्व: खर्चाने सायकल वर फिरून मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करतात व वेगवेगळ्या विषयांवर नेहमी जनजागृती करतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन त्यांचा सम्मान पत्र देऊन कौतुक केले .व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या सायकलची स्वारी केली.
या प्रसंगी मा. मनिष कुमार गायकवाड साहेब प्रांत भाग एरंडोल व मा .सौ . सुचिता चव्हाण तहसीलदार एरंडोल व डि.डि कॉलेज चे अध्यक्ष अमित पाटील तसेच पारोळ्याचे तहसीलदार साहेब धरणगाव चे तहसीलदार साहेब व इतर आधिकारीउपस्थित होते.