विलास मोरे यांच्या कादंबरीला उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी – एरंडोल येथील विलास कांतीलाल मोरे यांना त्यांच्या “पांढरे हत्ती काळे दात” या कादंबरीला प्रविण बांदेकर , सावंतवाडी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते यांचे हस्ते उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, महावस्त्र , श्रीफळ आणि ग्रंथ असे आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य .डॉ . सुनिल लवटे , कोल्हापूर हे होते . विलास मोरे यांची “पांढरे हत्ती काळे दात” ही कादंबरी वर्तमानाच वास्तव दर्शन असून राजकीय आरक्षणासोबत शिक्षणाची आवश्यकता विशद करतानाच पुन्हा पुन्हा एकलव्याचे अंगठे कसे कापले जात आहेत याचं विदारक चित्रणही मोरे यांच्या या कादंबरीत येते. ग्रामीण भागातील मिश्किली, छुपी कुटनिती आणि अशिक्षित सामाजाचे होणारे शोषण यावर कादंबरी कोरडे ओढते , त्यामुळे कादंबरी हातात घेतली किती पूर्ण केल्याशिवाय सोडवत नाही हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे .
निव्वळ मनोरंजन नव्हे तर समाजप्रबोधनाची कास धरून वास्तवाचे चित्रण करणारी ही कादंबरी असल्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन अध्यक्ष प्राचार्य डॉ . सुनिलकुमार लवटे यांनी केले .
पारिक्षक प्रा . डॉ . रफीक सुरज यांनी परिक्षण करतांना कसे निपक्षपातीपणे व पारदर्शक पध्दतीने निवड प्रक्रीया पार पाडली या बाबत साहित्याचा विविध अंगाची चर्चा केली .
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी कादंबरीची मांडणी प्रसंग आणि संवाद यावर भाष्य करून विलास मोरे यांचे सहर्ष अभिनंदन केले .
पुरस्कार प्राप्त कादंबरीकार विलास मोरे यांनी आपल्या मनोगतात साहित्य हे अस्सल समाजाभिमुख आणि वास्तवदर्शी असल्यास ते दीर्घकाळ वाचकांच्या मनावर अधिराज्य करत असते . माणसाच्या दुःखाची झळ साहित्यातून वाचक मनाला चटका लावून जाणारी असली तर त्याचे व्रण वाचकाच्या काळजावर उमटतात त्यामुळे ” पांढरे हत्ती काळे दात ” कादंबरी वाचकाला वास्तव अनुभूती प्रधान करते अशी भावना व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाने अध्यक्ष आर . एम . पाटील तर आभार प्रदर्शन सचिव सुरेंद्र पाटील यांनी केले .
विलास मोरे यांना राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त झालेला असुन त्यांची हीच कादंबरी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात एम . ए . ला अभ्यासक्रमाला आहे . या कादंबरीला पूर्वी म .सा .प. पुणे व जामनेर यांचे पुरस्कारासह एकुण चार पुरस्कार मिळाले आहेत .
विद्यापीठातील मराठी भाषा प्रमुख प्रा . डॉ . म . सु .पगारे, अॅड . मोहन बी शुक्ला , महेश सुर्यवंशी , डॉ . सुरेश पाटील, प्रा . डॉ . वासुदेव वले , डॉ . अशोक कोळी , बी.एन. चौधरी, मिलिंद बागुल, संजय जाधव, विजय जाधव यांनी व ,
साहित्यिक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले .