भाजप वैद्यकीय आघाडी , “उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक “पदी डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांची नियुक्ती !

IMG-20240217-WA0096.jpg

प्रतिनिधी -एरंडोल येथील माजी नगरसेवक , भूलवैद्यकतज्ञ डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी राज्य संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे व प्रदेश प्रभारी खासदार डॉ अजित गोपछडे ह्यांनी नियुक्ती केली आहे .
त्याचप्रमाणे भाजप वैद्यकीय आघाडी ने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विधानसभा संयोजक म्हणून एका सदस्याची नियुक्ती विधानसभा निवडणुकीसाठी केलेली आहे . त्या अनुसार” एरंडोल विधानसभा वैद्यकीय आघाडी संयोजक ” म्हणून हि डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .
डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्यापूर्वी भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य , जिल्हा उपाध्यक्ष व मागील तीन वर्षे भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्हा मुख्य संयोजक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे .
डॉ नरेंद्र ठाकूर हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रात ही कार्यरत असून ” सुखकर्ता फाउंडेशन ह्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्याचप्रमाणे इतर विविध संस्थाच्या द्वारे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .कोरोनाच्या संकटकाळात एरंडोल परिक्षेत्रात केलेल्या विविधांगी समाजोपयीगी कार्याबद्दल मा . राज्यपाल ह्यांच्या हस्ते “कोरोनावीर ” म्हणून डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांना सन्मानित करण्यात आले आहे .
डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्या नियुक्तीबद्दल भाजप वैद्यकीय आघाडी चे माजी प्रभारी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीषभाऊ महाजन , माजी विभागीय संघटनमंत्री तथा प्रदेश अनु.जनजाती क्षेत्रीय संपर्क प्रमुख ॲड. किशोर काळकर , महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष तथा प्रभारी ,खासदार डॉ अजितजी गोपछडे , प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे , प्रदेश सहसंयोजक डॉ राहुल कुलकर्णी , प्रदेश सहसंयोजक डॉ प्रशांत पाटील ह्यांचे आभार मानले आहेत .
त्यांच्या ह्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .

About Author

You may have missed

error: Content is protected !!