शिवजयंती निमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची प्रभात फेरी एरंडोल शहरात संपन्न
प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. राजांचा जन्मोत्सवानिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०१४ रोजी एरंडोल शहरांमध्ये प्रभात फेरी निघाली, या प्रभात फेरीची सुरुवात रा.ती. काबरे विद्यालयाच्या मैदानावरून सुरू झाली. यावेळी शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून रॅलीला सुरुवात केली . रॅलीमध्ये ट्रॅक्टर वर सजावट करून बाल शिवाजी व माॅं जिजाऊ साहेब व मावळे, यांना ट्रॅक्टर वर आसन देऊन, सजीव देखावा रेखाटला होता.तसेच इयत्ता आठवीचा प्रणव महाजन हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत घोड्यावर आरुढ होऊन वाजत गाजत संपूर्ण गावात मोठ्या आनंदाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी आपल्या मराठमोळ वेशभूषा मध्ये तर नववीचे विद्यार्थी मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये या रॅलीमध्ये सहभागी होते. सातवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी लेझीम च्या तालावर सुंदर नृत्य सादर केले . तसेच काही लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत सजीव देखावा केलेला होता. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन , व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते करून पुढे मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषाने एरंडोल शहर दणाणून सोडलं तर इयत्ता नववीचा विद्यार्थी रणवीर बोरसे व इयत्ता सातवी चा विद्यार्थी श्रेयस खैरनार यांच्या शिवगर्जना, जय घोषाने एरंडोल वाशीयांचे लक्ष वेधून घेतले तसेच मुली मराठमोळ वेशभूषा मध्ये मोठ्या आनंदाने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या,लेझीम पथकाने आपल्या लेझीम नृत्यावर एरंडोल वाशीयांना मंत्रमुग्ध केले, या प्रभात फेरीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या या राजे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या जन्मोत्सवाला संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय संस्थाचालक शाळेची चेअरमन प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलयांचे मार्गदर्शन लाभले होते.