बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा
( प्रतिनिधी ) – धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला.मराठी भाषा गौरव व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन एकाच दिवशी असल्याने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.शाळेतील प्राथमिक विभाग मुख्याध्यापक जीवन पाटील सर व माध्यमिक विभाग मुख्याध्यापक एस एस पाटील सर यांनी भारतमाता व कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
याप्रसंगी शाळेतील उपशिक्षिका जयश्री बोरसे यांनी विद्यार्थ्यांना राजभाषा दिवसाचे महत्त्व व मराठी भाषा कशी समृद्ध करता येईल, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार कशा पद्धतीने करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.