एरंडोल तालुका कमिटीच्या बैठकीत बी एल ए नोंदणी व आगामी लोकसभा निवडणुकीत संबंधि कार्यकर्त्याची नियुक्ती.
प्रतिनिधी:- एरंडोल येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक होऊन यावेळी संदीप घोरपडे ( निरीक्षक )एरंडोल तालुका यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी विविध पदांची नियुक्तीपत्रे कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आली ऑनलाइन बी एल ए नोंदणी व आगामी काळात होऊ लोकसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर उहापोह करण्यात आला .
भाजपाला ३७० पार चा विश्वास आहे तर फोडाफोडीचे राजकारण का केले जात आहे असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी मारला बाहेरून आलेल्या लोकांना पदे मिळतात व पक्षातील कार्यकर्त्यांना दूर केले जाते त्यामुळे भाजपा मध्ये पक्षांतर्गत धकधक सुरू आहे असा आरोप प्रदीप पवार यांनी केला इंडिया आघाडीचा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तन मन धनाने सर्वांनी निर्धार करावा असे आवाहनही करण्यात आले बेरोजगारी वाढती महागाई शेतीमालाचे पडलेले भाव अशा आसमानी व सुलतानी संकटात शेतकरी व नागरिक सापडले आहेत अशी टीका करण्यात आली.
प्रास्ताविक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोविंदा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रा.आर एस पाटील यांनी केले यावेळी डॉ. फरहाज बोहरी प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन कलीम शेख अल्पसंख्याक, तालुका अध्यक्ष,अ.हक गुलाब अहमद तालुका उपाध्यक्ष, डॉ.प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष,मो.अयाज मुजावर अल्पसंख्याक,शहर अध्यक्ष, पंडित महाजन, सुरेश अहिरे,तालुका अध्यक्ष,अनू.जाती जमाती, नारायण मोरे तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष, समाधान चौधरी शहर अध्यक्ष,कासोदा, रविंद्र पाटील, युवराज पाटील,सागर पाटील निपाणे,अन्वर खाॅं, महंमद खाॅं, सुरेश शा.पाटील, राजेंद्र चौधरी, नामदेव माळी, सुरेश पवार कासोदा तालुकाध्यक्ष,अ.नबी मुजावर,मुक्कीम बागवान हे उपस्थित होते