स्व: खर्चाने सायकल वर फिरून मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करणारे मधूकर ठाकूर यांची जळगाव आकाशवाणीवर मुलाकात….
प्रतिनिधी :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील मधूकर ठाकूर अनेक प्रकारच्या विषयावर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्व: खर्चाने सायकल वर फिरून मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करतात. या गोष्टीची दखल घेत जळगाव आकाशवाणीवर किशोर पवार यांनी त्यांची मुलाकात घेतली . यात गेल्या २० वर्षापासून मतदान जनजागृती, पाणी वाचवा, झाडे जगवा , बेटी बचाव बेटी पढाव अश्या अनेक गोष्टींची जनजागृती कासोदा , फरकांडे , निपाणे , जवखेडे अनेक खेड्यात जाऊन जनजागृती करतात. जनजागृती करून सुद्धा मतदानाची टक्केवारी कमी का होते या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकुर यांनी सांगितले की, जर मतदान केले तर आपल्या गावाचा विकास होईल. असे अनेक प्रश्नांची उत्तरे ठाकूर यांनी दिले.
ठाकूर यांची जळगाव आकाशवाणीवर मुलाकात घेतल्यानंतर कासोदा व परिसरातील लोकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.