एरंडोल स्मशान भूमीत मात्र रोज हजारो लिटर पाणी जातय वाया !
नगरपालिकेचे जाणूनबुजून दुर्लक्ष.

Picsart_24-05-26_11-27-12-572.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथील अंजनी धरणात मृत साठा शिल्लक असताना  शहरातली स्मशान भूमीत मात्र रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसतोय. करोडो रूपयांचा निधी खर्च करून एरंडोल शहराचा विकासात भर घालत भव्य अशी स्मशान भूमी उभारण्यात आली. ज्या मध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देखील उभारण्यात आल्या परुंतू आज याच स्मशान भूमीची देखरेख ठेवण्यात कुठं तरी  हलगर्जी पणा दिसून येतोय. स्मशान भूमीत असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी ओव्हर फ्लो झाल्याने रोज तासन तास हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.या टाकीवरून झालेली पाईप लाईन फुटल्याने तसेच पाण्याचे नळ तुटलेले असल्याने तेथील इमारतीत पाणी पाझरून इमारत देखील कमकुवत होत आहे तसेच या वाहून आलेल्या पाण्याने स्मशान भूमीचा दर्शनी भागात असलेल्या मुख्य रस्त्यावर देखील पाणी साचत असल्याने अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना कित्येक दिवसांपासून मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे. श्मसान भुमीत येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेड मध्ये ओट्यावर नेहमी धूळ साचलेली असल्याने लोकांना शेडच्या बाहेर उन्हात उभे रहावे लागते.सदर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही.
    यामुळे लोकांच्या मनात संताप व्यक्त होत आहे.तरी न.पा.प्रशासनाने सदर विषया कडे तत्काळ लक्ष देऊन स्मशान भूमीत असलेले पाईप तसेच नळांची दुरुस्ती करून सध्या स्थितीत होत असलेल्या पाण्याचा अपव्यय थांबवावा. जेणे करून इमारतीचा गच्चीवर साचेलेल्या पाण्यामुळे त्या इमारतींना असणारा धोखा टळेल व रस्त्यात पाणी तुंबल्याने नागरिकांना होत असलेल्या अडचणी देखील दूर होऊ शकतील तसेच रोज हजारो लिटर पाण्याची होणारी नासाडी देखील थांबेल अशी मागणी जोर धरत आहे.तसेच शहरातील काही महत्त्वाच्या लोकांकडे खाजगी नळ कनेक्शन असून त्याला चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याचे देखील बोलले जात आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!