एरंडोल येथील प्रा. शरद महाजन यांना जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त प्रथम क्रमांक….!

1000387598.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथील शरद महाजन ( मनोर ) यांना जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ऑनलाईन व्यंगचित्र स्पर्धेत मोठ्या गटात राज्यस्तरीय बाळकडू व्यंगचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
सदर स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती या स्पर्धेत राज्यभरातून २०० होऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. प्रामुख्याने ठाणे व कल्याण या ठिकाणाहून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी सदर ऑनलाइन स्पर्धेत मोठा गट मध्यम गट व छोटा गट तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सदर सदर स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी साठी छोटा गट व विषय आवडीचे कार्टून कॅरेक्टर तसेच सहावी ते दहावी मध्यम गट व दहावीच्या पुढे खुला गट यांच्यासाठी निवडणूक मतदान जागृती आपल्या आवडीच्या नेत्याचे व्यंगचित्र असे विषय ठेवण्यात आले होते. तसेच प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास सर्टिफिकेट व मेडल व तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली होती. यात एरंडोल येथील प्रा. शरद महाजन ( मनोर ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर निखिलसिंग परदेशी धुळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून तृतीय क्रमांक विनायक पेंडूरकर मुंबई यांनी पटकावला तसेच भूषण फुलं बरकर वर्धा व राहुल पाटणकर पुणे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. यावेळी सर्व विजेत्यांचे सर्व विजेत्यांचे आयोजक अनंत घरत प्रसिद्धीप्रमुख शिवसेना पुणे , अमित पापळ व्यंगचित्रकार पापळ कार्टूनवाला यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
प्राध्यापक शरद महाजन यांचे पत्रकार संघ व शहरातील पत्रकार सामाजिक , राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!