दापोरी येथील शेतकऱ्यांनी केळी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा यासाठी दिले निवेदन…!

InCollage_20240607_101144263.jpg

प्रतिनिधी :- तालुक्यातील दापोरी येथे दि. ४ में २०२४ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी एरंडोल तहसीलदारकडे निवेदन दिले.
    निवेदनात शेतकऱ्यांचे वादळी पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनाकडे तहसीलदार यांनी प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कुंदन  कोळी सरपंच , मुकेश  मराठे उपसरपंच, गणेश पाटील , शरद कोळी , पंकज पाटील , पुंडलिक पाटील , किरण पाटील , मधुकर पाटील , कल्याण पाटील , प्रमोद पाटील , प्रदीप पाटील , विनोद पाटील , निलेश पाटील , संजय पाटील , मयूर गुजर , प्रशांत कोळी , मिलींद बाविस्कर , विकास कोळी , सुदाम पाटील ,  जगन्नाथ पाटील , रवींद्र पाटील , व अनेक शेतकरी उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!